Tuesday, 13 August 2024

खादी : एक नवा अध्याय विणताना

*खादी : एक नवा अध्याय विणताना* 

महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापना दिन सोहळ्याला, अलीकडच्या निवडणुकांमुळे थोडासा उशीर झाला असला तरी, स्थापना दिनाचे माझ्यासाठी विशेष महत्त्व आहे. छोट्या उद्योगांना 'उद्योग भरारी' पुरस्कार देताना माझ्या मनात खादीशी असलेल्या माझ्या नात्याच्या आठवणी जाग्या झाल्या.... खादीची एक साधी प्रशंसक म्हणून सुरुवात करून, तिची मुख्य कार्यकारी अधिकारी बनण्यापर्यंतचा माझा प्रवास खूपच भावनात्मक, आव्हानात्मक आणि नाविन्यपूर्ण शिकण्याचा राहिला आहे.
     दिल्लीच्या कनॉट प्लेसमधल्या गजबजलेल्या खादी भांडाराला माझ्या आईसोबत भेट दिल्याचे मला आजही ठळक आठवते.हे खादी भांडार अजूनही भारताच्या आत्मनिर्भरतेचे प्रतीक आहे आणि त्याच वेळी खादीच्या जगातल्या संघर्षांची कडवी वास्तविकता मला सतत जाणवू देते. केवळ काही समर्पित खादी संस्था आणि विणकरच या प्रचंड मोठ्या वारशाचे  जतन करण्यासाठी संघर्ष करत आहेत.
महाराष्ट्रातील मध  संचालनालयाचा मधुबन मध, खादी मंडळा चा एक महत्त्वाचा भाग आहे. त्याच्या गोडवीत आणि गुणवत्ते च्या प्रचार प्रसारामधे मी जरी गुंतवून असले तरीही खादीचे आकर्षण माझ्या मनात कायम आहे कारण तो एक समृद्ध वारसा आहे जो केवळ तोंडदेखले कौतुक न करता अधिक काही मागतो. एकेकाळी राष्ट्रीय अभिमानाचे प्रतीक असलेली खादी कड़े आपले लक्ष्य आता कमी होत चालली आहे, असे मला सतत वाटते.
याची  अनेक कारणे असू शकतात. आधुनिक ग्राहकांना सतत बदलणारे आणि स्वस्त फॅशनचे कपडे आकर्षित करतात. त्याच्या तुलनेत, खादीची साधी रचना आणि पारंपरिक उत्पादन प्रक्रिया महागडी आणि कालबाह्य वाटू शकते. खादीला अनेकदा फक्त पारंपरिक कपड्यांसाठी योग्य मानले जाते, परंतु तिचा आधुनिक आणि बहुपयोगी फॅशन  म्हणून वापर फारसा केला जात नाही. खादीची कपडे महाग असल्याने ते खरेदी करणे काही ग्राहकांना अडचण वाटू शकते. विणकारांना पुरेसा मोबदला मिळत नसल्याने ते देखील उत्पादन पुरेसे करत नाहीत. 
अशा अनेक आव्हानांमुळेही खादी मागे पडत आहे. परंतु खादी पर्यावरणपूरक असल्याने टिकाऊ फॅशनच्या वाढती मागणी साठी सहज उपयुक्त ठरु शकते. आपल्याला देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेवर लक्ष केंद्रित करून, खादीचे उत्पादन केवळ कपड्यांपर्यंत मर्यादित न ठेवता विस्तारीत करायला हवी. खादीचा वापर फक्त कुर्ता, जॅकेट शर्ट पुरताच मर्यादित न ठेवता, टॉवेल, रुमाल,घरगुती कपडे, महिलांचे दुप्पटे आणि अशा अनेक कपड्यांसाठी करता येईल. खादीचे पर्यावरणपूरक,आरामदायीपणाचे आणि टिकाऊपणाचे गुणविशेष ठळक करून एक मजबूत ब्रँड तयार करणे आवश्यक आहे. आधुनिक आणि स्टायलिश खादी कपडे तयार करण्यासाठी डिझाइन आणि अत्याधुनिक पिढीला आवडणारे कपडेमध्ये  गुंतवणूक करणे महत्त्वाचे आहे. खादी कारागीरांचे सबलीकरण, त्यांच्या उत्पादनांना सवलत देणे आणि त्यांना चांगली साधने आणि बाजारपेठ मिळवून देणे यावर देखील भर दिला पाहिजे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना, खादीचा हाताने विणलेला आणि हाताने कातलेला धागा विशेषत्व कायम राखणे महत्त्वाचे आहे. खादी कारागीरांच्या यशोगाथा, त्यांचा संघर्ष आणि हस्तकला खादीच्या प्रचारासाठी प्रभावीपणे वापरने आवश्यक आहे.

आगामी काळ खादी साठी  आव्हानात्मक असले तरी त्याचे फळ खूप मोठे असू शकते. आपल्या देशाचे आदरणीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदी यांनी बरोबरच सांगितले आहे की, खादी केवळ एक कपडा नाही; तो आपल्या वारशाचा, आत्मनिर्भरतेचा आणि टिकाऊपणाचे प्रतीक आहे. खादीला पुनरुज्जीवित करून, आपण कारागीर, पर्यावरण आणि राष्ट्रासाठी एक उत्तम पर्याय निर्माण करू शकतो.

राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या स्थापना दिनी, चला खादीच्या गौरवशाली इतिहासात एक नवा अध्याय विणण्याची शपथ घेऊया. मी माझे पूर्ण योगदान देण्याचे वचन देते....तुम्ही ही देणार ना ?

- *आर विमला*
-मुख्य कार्यकारी अधिकारी 
-महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ

Translated in Marathi thanks to Shri. Bipin Jagtap, Deputy Chief Executive Officer,  Maharashtra State Khadi and Village Industries Board 

No comments:

Post a Comment

A poster exhibition & Journey Through Time & Travel at the Heritage Transport Museum

A poster exhibition & Journey Through Time & Travel at the Heritage Transport Museum It was Sunday but I woke up with excitement. I...